पुणे – पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेडच्या कार्यक्रमाला आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात बोलत असताना गडकरी यांनी यशाचे अनेक बाप असतात. पण अपयश अनाथ असते, असे सूचक वक्तव्य केलं आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे गडकरी यांनी थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला असल्याची चर्चा सुरु आहे.
दरम्यान लोकसभा निवडणूक हरलेल्या उमेदवाराला जेव्हा विचारतो का हरलास तेव्हा तो ‘फ्लेक्स लावण्यास पक्षाने पैसे दिले नाही’, असे कारण देतो. पण माझे म्हणणं आहे. की यशाप्रमाणेच अपयशाची जबाबदारी घ्यायला नेतृत्वाने शिकले पाहिजे असं गडकरींनी म्हटलं आहे. चांगले काम करणाऱ्याच्या पाठीशी सरकारने उभे राहीले पाहिजे. मग तो कुठल्याही पक्षाचा असो. तर वाईट काम करणारा आपल्या पक्षाचा जरी असला तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं गडकरींनी म्हटलं आहे. काँग्रेस सत्तेत असताना भाजपच्या संस्थावर कारवाई केली जाते. तर भाजप सत्तेत आल्यावर काँग्रेस च्या संस्थवर कारवाई केली जाते.हे थांबवले पाहिजे असंही यावेळी गडकरी यांनी म्हटलं आहे.
COMMENTS