मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात जुने मित्रपक्ष म्हणून शिवसेना-भाजपकडे पाहिले जाते. मात्र, मागील एक वर्षांपासून या दोन वर्षांमध्ये दुश्मनी झाली आहे. त्यामुळे दररोज दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर चिखल फेक करण्यात गुंतलेले असतात. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सर्वपक्षातील नेत्यांशी असलेले संबंध त्यांनी कधी लपवले नाही. शरद पवार, तत्कालीन कॅंग्रेस नेते नारायण राणे यांचे दिलखुलासपणे कौतुक करणे असो वा आपल्या पक्षाच्या नेत्यांवर टिका करणे ते कधीही मागेपुढे बघत नाहीत.
नितीन गडकरी यांनी गुरुवारी मुंबईत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निवासस्थानी भेट दिली. दरम्यान, त्यांचा जोशी यांच्या पाया पडून आर्शिवाद घेतले. या फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दोन्ही पक्षातील दिग्गज नेते राजकारणापलिकडची नाती जपताना दिसत आहेत.
केंद्रात प्रमुख मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळणारे नितीन गडकरी यांच्या मनात आजही ‘आपल्या मुख्यमंत्र्यां’विषयी स्नेह आहे. सन १९९५ साली भाजप-शिवसेनेच्या सरकारमध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. त्यांच्या मंत्रीमंडळात गडकरी सार्वजनिक बांधकाम मंत्रीम्हणून काम करीत होते. तेव्हापासूनचे त्या दोन्ही नेत्यांमध्ये असलेले ऋणानुबंध कायम असल्याचे दिसून येत आहे. यावेळी दोन्ही नेत्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
COMMENTS