नागपूर – गेल्या एक महिन्यांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने आलेल्या तीन कृषी विधेयकाच्या विरोधात हे आंदोलन असून याबाबत सरकार आणि आंदोलकांमध्ये बैठका होऊन तोडगा निघत निघत नसल्याने आंदोलन चिघळले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेऊन शेतकरी व सरकामध्ये मध्यस्थ करावी, अशी इच्छा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली आहे.
नागपूरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाचं उद्घाटन कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, परिवहन मंत्री अनिल परब, पालकमंत्री नितीन राऊत उपस्थित होते. यावेळी नितीन राऊत यांनी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढावा, अशी मागणीही त्यांनी गडकरींकडे केलीय. दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मध्यस्थी करावी. केंद्र सरकार आणि आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांमध्ये गडकरी यांनी तोडगा काढावा, अशी मागणीच केली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
COMMENTS