नागपूर – केंद्र सरकारचं शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष असून अनेक उपाय योजले जात आहेत.तसेच लवकरच शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे न्याय मिळणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. “शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत हे आम्ही मान्य करतो. मात्र, त्यामागे अनेक वर्षांचे चुकीचे सरकारी धोरण आणि सध्याची जागतिक आर्थिक परिस्थिती कारणीभूत असल्याचंही गडकरी यांनी म्हटलं आहे. ते नागपुरातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन मागे घ्यावे असं आवाहनही नितीन गडकरी यांनी केलं आहे. तसेच आगामी निवडणुकीतही भाजप विकासाच्या मुद्द्यावरून मागे हटणार नाही.तसेच आम्हाला पूर्ण बहुमत मिळेल आणि नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान बनतील असा दावाही यावेळी नितीन गडकरींनी केला आहे. तसेच विरोधी पक्षातील नेते आमच्या ताकतीमुळे एकत्रित येत असून त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण झाले आहे. मात्र त्यांचं हे प्रेम लोकसभा निवडणुकांच्या आधी जागा वाटपाच्या मुद्द्यावरुन संपणार असल्याचंही गडकरी यांनी यावेळी म्हटलं आहे.
COMMENTS