मुंबई – शरद पवार यांनी राहुल गांधींवर केलेल्या टीकेला ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर
दिलं आहे. राहुल गांधी आमच्या पक्षाचे नेते आहेत, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आमच्या पक्षाच्या अनेकांनी बलिदान दिलं आहे. चीनबाबत राहुल गांधींनी प्रश्न उपस्थित केले ते पंतप्रधानांबाबत उपस्थित केले होते, त्यांनी राजकारण केलं नाही.
चीनने घुसखोरी केली नाही असं पंतप्रधानांनी वक्तव्य केलं त्याबाबत राहुल यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. शरद पवार आमचे नेते आहेत, महाविकास आघाडीचे नेते आहेत, यूपीएचे प्रमुख घटकपक्ष आहेत. असही नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान राहुल गांधी यांनी चीनबाबत व्यक्त केलेली चिंता मूलभूत प्रश्नांबाबत आहे. पवार साहेबांनी विसरायला नको की १९६२ च्या युद्धावेळी असलेली परिस्थिती वेगळी होती, देश शस्रसज्ज होत होता. शरद पवारांचे यशवंतराव चव्हाण हे संरक्षण मंत्री होते, इंदिराजींनी १९७१ चं युद्ध जिंकले होतं हे पण पवारांना आठवलं असते तर बरं झाले असतं
.पवार काँग्रेसच्या काळात संरक्षण मंत्री असताना त्यांनी काही चुका दुरुस्त केल्या असत्या तर बरं झालं असतं. पवार काँग्रेसमध्येच तयार झालेलं नेतृत्व आहे.
त्यांच्या मनात काँग्रेसबद्दल आपुलकी आहे. पवारांनी राहुल आणि सोनिया गांधींशी चर्चा केली असती तर त्यांच्या वक्तव्याचा अर्थ लक्षात आला असता.पवार यांनी मोदींना प्रसार माध्यमांना सामोरं जाऊन वस्तुस्थिती देशासमोर मांडण्याचा सल्ला दिला पाहिजे.
संवादात कुठेतरी चूक झाली आहे.
राहुल गांधी देशाला एकसंध ठेवण्यासाठी बोलले आहेत.
सीमेवर काय घडलं हे जाणून घेण्याचा अधिकार प्रत्येक भारतीयाला आहे. शरद पवारांनी पंतप्रधानांना सांगायला हवं होतं की, प्रेस समोर येऊन मन की बात सांगण्याऐवजी याबाबत जन की बात सांगायला हवी असही नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले होते शरद पवार?
काँग्रेस नेते राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीका केली होती. चीनने घुसखोरी केली असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावर देशाच्या संरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण करणे योग्य नाही असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले होते.
लडाखमध्ये झालेल्या संघर्षात चीनने किती भाग बळकावला आहे याबाबत माहिती नाही. मात्र १९६२ च्या युद्धात चीनने लडाखमधील बळकावेला ४५ हजार चौकिमीचा भाग चीनच्या ताब्यात आहे. तो भाग अद्याप आपल्याला मुक्त करता आलेला नाही, ही बाब विसरता येणार नाही. त्यामुळे आरोप करताना आपण भूतकाळात काय केले आहे, याचा विचार केला पाहिजे. राष्ट्रीय सुरक्षेसारख्या प्रश्नावर राजकारण करणे योग्य नाही असं पवारांनी म्हटलं होतं.
COMMENTS