मुबंई- देशात मध्यप्रदेश, राज्यस्थान आणि हिमाचल प्रदेश आदी राज्यांमध्ये बर्ड फ्लू रोगाचा संसर्ग झाल्याचे घटना घडल्या आहेत. मात्र, महाराष्ट्र राज्य वन, स्थलांतरीत पक्षी किंवा व्यावसायिक कुकुटपालन व्यवसायाच्या ठिकाणी अद्याप संसर्ग झालेला नाही. एखाद्या ठिकाणी अशी घटना घडल्यास तात्काळ पशुवैद्यकीय रुग्णालयात संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी केले आहे.
देशातील पाच राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यूचा कहर झाला असला तरी महाराष्ट्रात मात्र बर्ड फ्ल्यूची एकही केस आढळलेली नाही. राज्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झालेला नाही. मध्ये प्रदेश आणि राजस्थानमध्ये बर्ड फ्ल्यू साधर्म्य लक्षणं असलेल्या काही कोंबड्या सापडल्याची चर्चा आहे. वास्तविक त्यांना बर्ड फ्ल्यू झालेला नाही, असं सुनील केदार यांनी सांगितलं. राज्यात खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने दिलेल्या गाईडलाईन्स पाळल्या जात आहेत, असं सांगतानाच अन्य काही कारणाने जनावरांचा मृत्यू झाल्यास तात्काळ पशुसंवर्धन कार्यालयाशी संपर्क साधावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
COMMENTS