मोदी आणि विरोधकांची आज अग्निपरिक्षा, भाजपाचे काही खासदार सरकारच्या विरोधात मतदान करणार ?

मोदी आणि विरोधकांची आज अग्निपरिक्षा, भाजपाचे काही खासदार सरकारच्या विरोधात मतदान करणार ?

नवी दिल्ली – मोदी सरकाविरोधात टीडीपीने दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर आज मतदान होणार आहे. त्यामुळे आज सरकार आणि विरोधी पक्षाची अग्निपरिक्षा होणार आहे. सध्याच्या विचार करता मोदी सरकार सहजपणे बहुमताचा आकडा पार करण्याची शक्यता आहे. मात्र जास्तीत जास्त खासदार आपल्याबाजूने आहेत हे दाखवण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी जोरदार जुळवाजुळव सुरू केली आहे.  सरकार जिंकलं तरी त्याचे संख्याबळ कमी करण्याचे विरोधकांचे प्रयत्न आहे. त्यामुळे या लढाईत कोणं जिंकतं ते आता पहावं लागेल.

भाजपवर आजपर्य़ंत सातत्याने टीका करणार ज्येष्ठ खासदार शस्त्रुघ्न सिन्हा यांनी मात्र आपण भाजपसोबत आहेत. आजतरी पक्षाचा खासदार आहे. त्यामुळे भाजपलाच मतदान करणार असं स्पष्ट केलं आहे. मात्र भाजपचे काही नाराज खासदार अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करण्याची किंवा मतदानाच्यावेळी गैरहजर राहण्याची शक्यता आहे. यामध्ये मोदी सरकारला सातत्याने घेरणा-या उत्तर प्रदेशातील खासदार सावित्रीबाई फुले, बिहारमधील खासदार आणि क्रिकेटपटू किर्ती आझाद यांचा समावेस आहे. याशिवाय आणखी तीन खासदार भाजपच्या विरोधात असल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजपने सर्व खासदारांना व्हिप बजावला आहे. त्यामुळे ऐनवेळी हे खासदार काय करतात ते पहावं लागेल.

सरकारच्या बाजुने जुळवाजुळव करताना काल अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची माहिती आहे. तसंच शिवसेना सरकारच्या बाजुने उभी राहिल अशाही बातम्या माध्यमांमधून झळकल्या होत्या. चंद्रकांत खैरे यांच्या लेटरहेडवरुन भाजपला समर्थन देण्याचं पत्रही काही माध्यमांपर्यंत पोहचलं होतं. मात्र तरीही आनंदराव आडसूळ, अरविंद सावंत आणि संजय राऊत या तीन खासदारांनी पाठिंब्या निर्णय अजून झाला नसल्याचं सांगत सस्पेन्स कायम ठेवला आहे. आज सकाळी थोड्यावेळात म्हणज्येच 11 च्या सुमारास शिवेसनेची बैठक होणार आहे. त्या बैठकीत उद्धव ठाकरे शिवसेनेची भूमिका स्पष्ट करतील. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेविषयी अजून तळ्यात मळ्यात असल्याचं चित्र आहे. मोदी सरकारच्या विरोधात शिवसेना उभी राहते की तटस्थ राहून टीडीपीही नको आणि भाजपही नको अशी भूमिका घेते याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. असं झाल्यास दिल्लीतील सरकारमधून शिवसेनेच्या मंत्र्याला बाहेर पडावं लागण्याची शक्यता आहे.

COMMENTS