पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी आपले गोदाम भ्रष्टाचार करुन भरले

पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी आपले गोदाम भ्रष्टाचार करुन भरले

मुंबई – मुंबई महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत कोरोनावर मात करण्यासाठी सहा महिन्यात १६०० कोटी रुपये खर्च झाले. तरीही आणखी ४०० कोटी रुपये हवी आहेत. कोरोनाबाबत उपाय योजना केल्या पाहिजे. पण ज्या मुंबईकरांच्या पैशावर ही काम केली. त्यांची हिशोब द्या, अशी मागणी भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केली.

शेलार यांनी शिवसेनेवर टिका करीत असताना महापौरांच्या मुलाला आणि जावयाला किती मिळाले? सँनिटायझर पुरवणाऱ्या बोगस कंपन्यांच्या घशात किती घातले? पर्यावरण प्रेमी वरळीला किती गेले? याचा हिशेब द्यावा, अशी मागणी केली. महानगरपालिकेचा कारभार पारदर्शक व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.का लपवाछपवी करताय? हिशेब द्या! मुंबईकर कोरोनाने दगावले मात्र पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी कोरोना काळात आपले गोदाम भ्रष्टाचार करुन भरले?

COMMENTS