मुंबई – विधानसभेत आज पुन्हा एकदा माहिती अधिकार कार्यकर्ते आणि लोकप्रतिनीधी यांच्यामधील संघर्षाला तोंड फुटलं असल्याचं पहावयास मिळालं आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी काल सभागृहात बेछूट आरोप करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित केला होता. विधानसभेत आज पुन्हा एकदा हितेंद्र ठाकुर यांनी हा मुद्दा उपस्थित करत आपण खडसे नाही तर विधिमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसेंच्या ‘पीए’ने लाच घेतल्याचा आरोप झाल्याचं म्हटलं होतं, त्यामुळे एकनाथ खडसेंचा गैरसमज झाला असून त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो असंही ठाकूर यांनी विधानसभेत म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलत असताना त्यांनी आरटीआय कार्यकर्त्यांनी उच्छाद मांडला असून ते अनेक लोकप्रतिनिधींची बदनामी करत असल्याचं हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलं आहे. विधानसभेत मी व्यक्त केलेल्या भाषणांचे अनेक उतारे गायब झाल्याचाही आरोप आ. ठाकुर यांनी केला आहे. तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर आणि माझ्यावर काही जणांनी आरोप करत आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला असून आमदारांवर कोणीही कथित ऑडिओ क्लिप जाहीर करून बेछूट आरोप केले जात आहेत. त्यामुळे या आरोप करणा-यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही हिंतेंद्र ठाकूर यांनी केली आहे.
COMMENTS