मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्त विरोधकांकडून राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले.
नोटाबंदी वर्षपूर्तीनिमित्त जनता दल, स्वाभिमान शेतकरी संघटना आणि समविचारी सामाजिक संघटनांच्या वतीनं आज मुंबईतील आझाद मैदानात काळा दिन साजरा करण्यात आला. या आंदोलनात शेतकरयांचे नेते रघुनाथदादा पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, अर्थतज्ञ आणि माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि विविध समविचारी मान्यवर सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदी, GST आणि यासारख्या अनेक निर्णय-धोरणांवर आंदोलकांनी तीव्र टीका केली. वाढत्या महागाई विरोधात आंदोलनात भाजप सरकारविरोधात घोषणाही देण्यात आल्या.
‘नोटबंदीचा फटका शेतकऱ्यांना बसलाय. हमीभाव मिळाला नाही.’ असे रघुनाथ दादा पाटील म्हणाले. ‘नोटाबंदी निर्णयाने सर्वसामान्यांचा विश्वासघात केला. शेतकरी, कामगार या निर्णयामुळे उध्वस्त झाला. या निर्णयातून काय साध्य केलं याचं उत्तर मोदींना द्यावेच लागेल.’ अशी टीका राजू शेट्टींनी केली. ‘नोटबंदीमुळे सामान्य जनतेला त्रास झाला. काळा पैसा गेला कुठे ? दहशतवादी हल्ले थांबले नाहीत, असं अंजली दमानिया म्हणाले.
COMMENTS