कार्यालयाचा लिलाव टाळण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांची धावपळ, वर्गणी काढून भरतायत घरपट्टी !

कार्यालयाचा लिलाव टाळण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांची धावपळ, वर्गणी काढून भरतायत घरपट्टी !

नाशिक – कार्यालयाचा जाहीर लिलाव टाळण्यासाठी  काँग्रेस पदाधिकारी वर्गणीतून पैसा गोळा करणार आहेत.  शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने नाशिक महानगरपालिकेची 26 लाख 63 हजार रुपयांची घरपट्टी थकविली आहे. वारंवार सूचना देऊनही मालमत्ता कर जमा न केल्याने महापालिकेच्या विविध कर विभागाने काँग्रेस कमिटीसह शहरातील 394 अस्थापनांना जप्तीची नोटीस बजावली असून 21 दिवसात थकबाकी भरली नाही तर मालमत्तेचा लिलाव करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.

दरम्यान महापालिकेच्या नोटीसिमुळे बड्या थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत, त्यातच काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रदेश पातळीवर याबाबत माहिती दिली होती. मात्र वरीष्ठ पदाधिका-यांकडून कान टोचण्यात आल्यानं 26 लाख 63 हजार एवढी मोठी रक्कम आणायची कुठून असा प्रश्न स्थानिक पदाधिकाऱ्यांना पडला आहे. त्यामुळे वर्गणी काढून ही घरपट्टी भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,  मात्र कायमच गटबाजीचे दर्शन घडवणारे काँग्रेसजन जप्तीची पर्यायाने लिलावाची नामुष्की टाळण्यासाठी केव्हा एकत्र येतात याकडे सामान्य कार्यकर्त्यांच लक्ष लागलं आहे.

COMMENTS