राहुल गांधींना राष्ट्रीय महिला आयोगाची नोटीस !

राहुल गांधींना राष्ट्रीय महिला आयोगाची नोटीस !

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना राष्ट्रीय महिला आयोगानं नोटीस पाठवली आहे. राजस्थानमधील एका जाहीर सभेत बोलताना राहुल गांधी यांनी ”पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले आहेत. त्यामुळेच आपल्या बचावासाठी त्यांनी महिला मंत्र्याला पुढे केलं असल्याचं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरुन संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याबाबत त्यांनी अनुद्गार काढले, असल्याचं सांगत राष्ट्रीय महिला आयोगानं (एनडब्ल्यूसी) राहुल गांधी यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे. याबाबत एनडब्ल्यूसीने त्यांना नोटीस पाठवली असल्याची माहिती आहे.

दरम्यान राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राहुल गांधी यांनी पुरुषप्रधान मानसिकतेतून हे वक्तव्य केले आहे. आयोगाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. राहुल गांधी महिलांना कमकुवत मानतात का?” असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच राहुल गांधींचं वक्तव्य महिलांची निंदा करणारे आणि अपमानजनक असल्याचंही रेखा शर्मा यांनी म्हटले आहे.

COMMENTS