मुंबई – शिवसेनेचे खासदार आणि सामना या वृत्तपत्राचे संपादक संजय राऊत यांना जिल्हाधिकाय्रांनी नोटीस पाठवली आहे. आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली असून 3 एप्रिलपर्यंत आपला खुलासा सादर करावा असं मुंबई शहराचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी या नोटीसीत म्हटलं आहे.
दरम्यान या नोटीसीमध्ये संजय राऊत यांनी 31 मार्चरोजी लिहिलेल्या रोखठोक या स्तंभात ईव्हीएमचा घोटाळा बेगुसरायमध्ये झाला तरी चालेल असं वाक्य लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे हा आचार संहितेचा भंग असून त्याबाबत 3 एप्रिलपर्यंत खुलासा पाठवण्यात यावा असं या नोटीसीमध्ये म्हटलं आहे.
COMMENTS