आसाममध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजनने जाहीर केलेल्या यादीवरुन सध्या जोरदार राजकीय चिखलफेक सुरू आहे. एनआरसीने आसाममधील सुमारे 40 लाख लोक हे भारताचे नागरिक नसल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे एकच वादंग उठलं आहे. मात्र यादीत मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचं दिसून येत आहे. भारताच्या माजी राष्ट्रपतींचे नातेवाईकांची नावे भारतीय नागरिकांच्या यादीत नाहीत. तर एका अतिरेकी संघटनेच्या प्रमुखाचं नाव मात्र भारताच्या नागरिकांच्या यादित आहे. त्यावरुन नवा वादंग सुरू होण्याची शक्यता आहे.
एनआरसीने जाहीर केलेली यादी अंतिम नसली तरी त्यामध्ये झालेल्या घोळावरुन वाद सुरू झालाय. भारताचे माजी राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांच्या नातेवाईकांची नावेच भारतीय नागरिकांच्या यादीतून गायब झाली आहेत. राष्ट्रपतींच्या भावाच्या कुटुबियांची नावेही यामध्ये समाविष्ट केली नाहीत. उल्फा या अतिरेकी संघटनेचा प्रमुख परेश बरुआ याचं नाव भारतीय नागरिकांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलं आहे. एवढच नाही तर भाजपच्या एका आमदाराचं नावही भारतीय नागरिकांच्या यादीत नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
COMMENTS