ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यासंबंधीचे विधेयक राज्यसभेत मंजूर !

ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यासंबंधीचे विधेयक राज्यसभेत मंजूर !

नवी दिल्ली – ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यासंबंधीचे महत्त्वाचे विधेयक राज्यसभेतही मंजूर करण्यात आले आहे. यापूर्वी  लोकसभेत ३ ऑगस्टला हे विधेयक मंजूर करण्यात आले होते. १५६ सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केले तर या विधेकाच्या विरोधात एकही मत पडले नाही. ओबीसी विधेयकाला मंजुरी मिळाल्याने राज्यांच्या अधिकारांमध्ये घट होईल अशी जी शंका व्यक्त केली जात होती ती शंका निराधार असल्याचं केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान २०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर मागासवर्गींना खुश करण्यासाठी मोदी सरकारने हे विधेयक मंजूर केलं असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी हे विधेयक मंजूर झाल्याने भाजपा कार्यकर्ते आणि देशाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.

COMMENTS