मध्य प्रदेश – मध्य प्रदेशात दोन जागांवर घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज लागला आहे. अशोकनगर जिल्ह्यातील मुंगावली आणि शिवपुरी जिल्ह्यातील कोलारस मतदारसंघात ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती. मुंगावलीमध्ये काँग्रेसचे उमेदवार बृजेंद्र सिंह यादव आणि कोलारसमधील काँग्रेसचे उमेदवार महेंद्र सिंह यादव हे निवडून आले आहेत.
दरम्यान कोलारसमधून भाजपच्या देवेंद्र जैन तर मुंगावलीमधून भाजपचे बाई साहब हे निवडणुकीच्या मैदानात होते. परंतु या दोन्ही मतदारसंघात भाजपच्या या उमेदवारांचा पराभव झाला असून मुंगावलीमधून काँग्रेसचे बृजेंद्र सिंह यादव यांच्या 2 हजार 124 एवढ्या मतांनी विजय झाला आहे तर कोलारसमधून काँग्रेसचे महेंद्र सिंह यादव विजयी झाले आले आहेत.
दरम्यान 24 फेब्रुवारीला घेण्यात आलेल्या निवडणुकीत कोलारस येथे २२ तर मुंगावली येथे १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या दोन्ही ठिकाणी काँग्रेस आमदारांचे निधन झाले होते. मुंगावली आणि कोलारस या दोन्ही ठिकाणी भाजपा आणि काँग्रेसमध्ये काट्याची लढत पहायला मिळाली आहे.
ओडीशातही भाजपला धक्का
ओडिशा पोटनिवडणुकीतही भाजपला जोरदार धक्का बसला असून बीजेडीच्या रिता साहू यांचा मोठा विजय झाला आहे. 41 हजार 933 मतांनी रिता साहू यांनी भाजपच्या उमेदवाराला पराभूत केलं आहे. त्यामुळे देशभरातून भाजपची लाट आता कमी होत असल्याचं दिसत आहे.
COMMENTS