नवी दिल्ली – देशातील आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेतल्या जाणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबतचे संकेत काही राजकीय नेत्यांनी वर्तवले आहेत. परंतु याबाबतची प्रतिक्रिया मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी दिली असून संविधान आणि कायद्यात बदल केल्याशिवाय ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ शक्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
'One nation, one poll' is not possible until changes are made in constitution and law: Chief Election Commissioner, Om Prakash Rawat pic.twitter.com/4MQlKvwETC
— ANI (@ANI) August 29, 2018
दरम्यान ओमप्रकाश रावत यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेतल्या जाणार नसल्याचं दिसत आहे. तसेच यावेळी रावत यांनी मध्यप्रदेश विधानसभा निवडणुका नियोजित कालावधीत घेतल्या जाणार असल्याचंही जाहीर केलं आहे.
COMMENTS