मुंबई – लोकसभा निवडणुकीत देशासह राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राज्यात तर काँग्रेसची बिकट अवस्था पहायला मिळाली आहे. अशा स्थितीत राज्यातील बडा नेता काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.माजी काँग्रेस नेते आणि भाजपचे सहयोगी खासदार नारायण राणे हे पुन्हा काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान नारायण राणे जर पुन्हा काँग्रेसमध्ये गेले तर त्यांना आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काँग्रेसकडून मोठं आश्वासन देण्याची शक्यता आहे. तसेच काँग्रेसचे बंडखोर नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे विधीमंडळात आक्रमक नेत्याची कमी जाणवणार आहे.त्यामुळे राणेंना काँग्रेसमध्ये घेतलं जाण्याची शक्यता आहे. राणे जर काँग्रेसमध्ये गेले तर काँग्रेसला या परिस्थितीतून बाहेर काढतील का हे पाहण गरजेचं आहे.
COMMENTS