मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मोठा धक्का बसला असल्याचं दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यातील दोन मतदारसंघांमध्ये (सोलापूर, माढा) प्रभाव असणारे काँग्रेस नेते कल्याण काळे यांचा भाजपप्रवेश निश्चित झाला असल्याची माहिती आहे. पक्षात घुसमट होत होती. अनेक वर्षे पक्षाने फायदा घेतला. मात्र काँग्रेसमध्ये राहून जनतेचे प्रश्न सोडवू शकलो नाही. त्यामुळे जनतेचे हित लक्षात घेऊन भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं कल्याण काळे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान कल्याण काळे हे भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष असून ते सिताराम महाराज साखर कारखान्याचे संस्थापक आहेत. तसेच श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचेही ते अध्यक्ष आहेत. सोलापूर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्षपद त्यांच्याकडे होतं. तसेच सोलापूर जिल्हा सहकारी बँक असोसिएशनचेही ते अध्यक्ष आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांचे विश्वासू म्हणून कल्याण काळे यांची ओळख होती. शिंदे हे स्वतः काँग्रेसकडून सोलापूरचे उमेदवार आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.
COMMENTS