नांदेड – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला धक्का बसला असून 30 वर्षांपासून शिवसेनेसोबत एकनिष्ठ असलेले तालुका संघटक अशोक मोरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत मोरो यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून आपण शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली असल्याचं अशोक मोरेंनी म्हटलं आहे. त्यामुळे मोरे यांच्या रुपाने शिवसेनेला नांदेडमध्ये मोठा धक्ता बसला असल्याचं बोलसं जात आहे.
दरम्यान सर्वसमावेशक नेतृत्व अशोक चव्हाण यांच्याकडे असल्याने जिल्ह्याचा त्यांनी सर्वांगीण विकास केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आघाडीचाच विजय होणार असल्याचा विश्वासही अशोक मोरे यांनी म्हटलं आहे. मोरे यांचा जिल्ह्यात मोठा संपर्क असल्यामुळे याचा नक्कीच आगामी निवडणुकीत फायदा होणार असल्याचा विश्वास यावेळी चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
COMMENTS