पुणे – मतदानाच्या तोंडावर मावळमध्ये शिवसेनेची ताकद वाढली असून माजी खासदारानं अखेर घरवापसी केली आहे. गजानन बाबर हे मावळमधील शिवसेनेचे पहिले खासदार आहेत. 2014 साली तिकीट नाकारल्यानंतर बाबर यांनी मनसेमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीवेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर बाबर हे पुन्हा स्वगृही परतले आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधलं आहे. शिवसेनेत असताना बाबर यांनी सलग तीन वेळा नगरसेवक, दोन वेळा आमदार आणि एकदा खासदार म्हणून पद भूषविली आहेत. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत ते या मतदारसंघातून निवडून आले होते.
COMMENTS