मुंबई – लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देणारे साताऱ्यातील माण खटाव तालुक्याचे नेते शेखर गोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आज मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अन्याय झाल्याचा आरोप करून शेखर गोरे यांनी खुद्द शरद पवारांनाच फलटण येथील एका कार्यक्रमात जाब विचारून राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर गोरे यांनी लोकसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार खा. रणजित निंबाळकर यांना जाहीर पाठिंबा दिला होता.
दरम्यान गोरे भाजपमध्ये जाणार की शिवसेनेत याबाबत कुणालाच ठोस सांगता येत नव्हते. परंतु आज अखरे शेखर गोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यामुळे माण खटाव तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढली असल्याचं दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे साताऱ्यातील माण खटाव तालुक्याचे नेते शेखर गोरे जी यांनी आज मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. pic.twitter.com/w25pr3fvyX
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) August 8, 2019
COMMENTS