पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एक आमदार भाजपच्या वाटेवर, विखे पाटलांची घेतली भेट !

पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एक आमदार भाजपच्या वाटेवर, विखे पाटलांची घेतली भेट !

मुंबई – पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एक आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. पंढरपूरचे काँग्रेसचे आमदार भारत भालकेंनी आज राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली आहे. त्यामुळे भालके विखेंबरोबर भाजपात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. भालके यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर काँग्रेसला हा मोठा धक्का असणार असल्याचं बोललं जात आहे. कारण भारत भालके यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठी लीड मिळवून दिली होती. या मतदारसंघात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. परंतु आता ते भाजपमध्ये गेले तर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो.

दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर आमदार भारत भालके, जयकुमार गोरे, माढा खासदार रणजित निंबाळकर यांच्यात आज बैठक पार पडली. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांनी राजीनामा देणार असल्याती माहिती दिली आहे. पक्षाने माझी कोंडी केली आहे. काँग्रेसमध्ये माझी घुसमट होत आहे. आज विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे विखे यांच्या राजीनाम्यानंतर भारत भालकेही भाजपमध्ये जातील असा अंदाज आहे.

COMMENTS