सातारा – राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
महाविकासआघाडीतील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. राज्याचे सहकार व पणन मंत्री तसंच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु करण्यात आले आहेत. बाळासाहेब पाटील याची प्रकृती स्थिर आहे. काळजी करण्याची गरज नाही, अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे चिरंजीव जशराज (बाबा) पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची काही लक्षणे दिसून येत होती. त्यामुळे त्यांनी स्वत:हून अँटीजेन टेस्टसह आरटीपीसीआर चाचणी केली होती. हा चाचणी अहवाल शुक्रवारी मध्यरात्री पॉझिटिव्ह आला.त्यानंतर त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोविड-19 ची टेस्ट करुन घ्यावी, शिवाय किमान आठवडाभर विलगिकरणात रहावं असे आवाहन केले आहे.
याआधी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे,पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनाही कोरोनाची लागण झाली होती.
COMMENTS