अपक्ष आमदारांना तंबूत घेण्याचे भाजपकडून जोरदार प्रयत्न, आणखी एका अपक्ष आमदारानं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट!

अपक्ष आमदारांना तंबूत घेण्याचे भाजपकडून जोरदार प्रयत्न, आणखी एका अपक्ष आमदारानं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट!

चंद्रपूर – सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. शिवसेना आपल्या फॉर्म्युल्यावर ठाम राहिली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला प्लॅन बी तयार केला असल्याची माहिती आहे. अशातच आता आणखी एका अपक्ष आमदारानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबईत वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आहे. चिमूर क्षेत्राचे भाजप आमदार बंटी भांगडीया यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची भेट झाली आहे. त्यामुळे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार देखील भाजपला पाठिंबा देतील अशी चर्चा आहे.

दरम्यान यावरुन अपक्ष आमदारांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी भाजपचे निकराचे प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे. अशातच जोरगेवार यांनी शहर विकासाच्या मुद्द्यावर भाजपला समर्थन करण्याची भूमीका घेतल्याची माहिती आहे. याआधी मुख्यमंत्र्यांच्या काकू शोभाताई फडणवीस यांनी जोरगेवार यांची घेतली होती. त्यामुळे निवडणुकीदरम्यान भाजपवर तिखट टीका केलेले जोरगेवार आता भाजपच्या तंबूत जाण्याच्या शक्यता आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे निवडणुकीत जाहीर पाठींबा देणारे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपाई कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत.

COMMENTS