मुंबई – मुख्यमंत्रीपदावरुन भाजप-शिवसेनेमध्ये सध्या रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे दोन्ही पक्षामध्ये ताकद वाढवण्याचे प्रयत्न सुरु असून अपक्षांचा पाठींबा घेत आपले संख्याबळ वाढवत आहेत. यामध्ये शिवसेनेने अपक्षांचा षटकार मारला आहे. साक्री विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार मंजुळा गावित यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे संख्याबळ 62 वर पोहोचले आहे.
साक्री विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार मंजुळा गावित जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला. pic.twitter.com/ZJbcoELfOy
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) October 30, 2019
दरम्यान मंजुळा गावीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. साक्री विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार मोहन सुर्यवंशी यांचा त्यांनी ७ हजार मतांनी पराभव केला. परंतु आता निवडून आल्यानंतर मात्र त्यांनी आपला शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे.
यापूर्वी अपक्ष आमदार बच्चू कडू, राजकुमार पटेल यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला होता. तसेच अहमदनगरमधील नेवासा मतदारसंघातील आमदार शंकरराव गडाख यांनीही शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर आज गावीत यांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळे शिवसेनेची ताकद वाढली आहे.
COMMENTS