नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आणखी एक पक्ष भाजपमध्ये विलीन झाला आहे. गोव्यातील महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष भाजपमध्ये विलीन झाला असून या पक्षाच्या दोन आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. आमदार मनोहर आजगावकर आणि दीपक पावस्कर यांनी गोवा विधानसभेचे उपसभापती मायकल लोबो यांच्याकडे पत्र दिलं आहे. यामध्यो त्यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे भाजपात विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान मध्यरात्री घडलेल्या या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर ३६ आमदारांच्या गोवा विधानसभेत आता भाजपाच्या आमदारांची संख्या १२ वरुन १४ झाली आहे. त्यामुळे भाजपाच्या आमदारांची संख्या काँग्रेस आमदारांच्या इतकी झाली आहे.
तसेच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे एकून तीन आमदार आहेत. पक्षांतर बंदी कायद्यानुसार दोन तृतीयांश पेक्षा जास्त सदस्यांनी पक्षांतर केल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होत नाही. त्यामुळे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे आमदार भाजपात आल्याने गोव्यातील भाजपा सरकार आता स्थिर झालं आहे.
COMMENTS