मुंबई – रजनिकांत, कमल हसन, या अभिनेत्यांनी राजकारणात एन्ट्री मारल्यानंतर आता आणखी एक अभिनेता राजकारणात येणार असल्याची चर्चा आहे. अभिनेते आशुतोष राणा राजकारणात सक्रीय होणार असल्याचं बोललं जात आहे. याबाबत राणा यांनी फेसबुकवर सविस्तर पोस्ट लिहून, राजकारणात येणार का, या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. “गेल्या काही दिवासंपासून माध्यमांमधून मी 2019 ची लोकसभा निवडणूक लढणार आहे, असे अंदाज बांधले जात आहेत. कुणी म्हणतंय, मी जबलपूरमधून निवडणूक लढेन, कुणी म्हणतंय होशंगाबाद-नरसिंगपूरमधून लढेन, तर कुणी म्हणतंय आणखी कुठल्यातरी जागेवरुन लढेन. असं आशुषतोष राणा यांनी म्हटलं आहे.
दरम्यान शालेय जीवनापासूनच मला राजकारणात रस आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षात माझे जवळचे मित्र आहेत आणि ते त्या त्या पक्षात महत्त्वाच्या पदावर आहेत. या मित्रांशी दशकांपासूनची मैत्री आहे. त्यामुळे राजकारण माझ्यासाठी नवं नाही आणि राजकारणाची चाल, चित्त आणि चिंतन मी चांगल्याप्रकारे जाणतो असं राणा यांनी म्हटलं आहे.
तसेच भविष्यात काय होईल माहित नाही. मात्र, सध्यातरी मी अभिनेताच आहे. अभिनयात मला आनंद मिळत आहे आणि अभिनयातून माझं अजून मन भरलं नाही. त्यामुळे माझ्या राजकीय सक्रियतेच्या चर्चांना पूर्णविराम मिळावा असं स्पष्टीकरणही अभिनेते आशुतोष राणा यांनी दिलं आहे.
COMMENTS