मुंबई – अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सभागृहाची माफी मागण्याची वेळ आली आहे. सभागृहात राज्यपालांच्या इंग्रजी अभिभाषणाचा मराठीत अनवाद न झाल्यामुळे विरोधकांनी जोरदार गोंधळ केला होता. तसचे हे सरकार मराठी भाषेचा आवाज दाबत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. तसेच राज्यपालांच्या भाषणावर बहिष्कार घालत विरोधकांनी सभात्याग केला.
दरम्यान सभागृहात मराठी भाषेत राज्यपालांच्या भाषणाचा अनुवाद ऐकवला जातो परंतु अनुवादक न आल्यामुळे राज्यपालांचं इंग्रजीतूनच अभिभाषण झालं. त्यामुळे यावर विरोधकांनी राज्यपालांसमोरील मोकळ्या जागेत येऊन जोरदार घोषणाबाजी केली. अभिभाषण गुजराती भाषेतून ऐकू आलं असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला असून हा मराठी भाषेचा खून असल्याचं काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. तसेच सरकार मराठीची गळचेपी करत असल्याचा विरोधकांनी आरोप केला असून आधी शांत असलेले शिवसेनेचे आमदारही त्यानंतर उभे राहिले. त्यानंतर विरोधकांचा वाढत रोष पाहता संसदीय कामकाज मंत्रीपदाचा तात्पुरता कार्यभार असलेल्या विनोद तावडे यांनी मराठीतील भाषांतर वाचले.
COMMENTS