नागपूर – आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनादरम्यान काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक झाले आहेत. या आमदारांनी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विधीमंडळाच्या पाय-यांवर आंदोलन केलं आहे. विविध मागण्यांवर विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली आहे. तीन वर्ष होऊनही भाजपनं दिलेलं एकही आश्वासन पाळलं नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या सरकारनं जनतेची घोर फसणूक केली असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. अजित पवार, राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादीचे सर्वच आमदार विधीमंडळाच्या पाय-यांवर बसले आहेत.
आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. सरकारविरोधातील घोषणाबाजीचे फलक हातात घेऊन विधीमंडळाच्या पाय-यांवर विरोधकांनी ठिय्या मांडला आहे. सरकारनं कर्जमाफीमध्ये शेतक-यांची घोर फसवणूक केली असल्याचा आरोप त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला आहे.
विरोधकांनी पहिल्याच दिवशी विधीमंडळाच्या पाय-यांवर हा राडा घातल्यामुळे हे अधिवेशन चांगलच तापत असल्याचं पहायला मिळत आहे.
COMMENTS