नवी दिल्ली – शरद पवारांसह विरोधकांना मोठा धक्का बसला असून सर्वोच्च न्यायालयानं EVM बाबतची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. EVM संदर्भात विरोधीपक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आपल्या याचिकेमध्ये 50 टक्के व्हिव्हिपॅट मशीन आणि EVM मतांची एकत्रित मोजणी करण्याची मागणी 21 विरोधीपक्षांनी केली होती. पण, सर्वोच्च न्यायालयानं विरोधकांची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे.
दरम्यान EVMमध्ये घोळ असून त्याचा फायदा हा भाजपला होत असून 50 टक्के व्हीव्हीपॅट मशीनची मोजणी करण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी केली होती. पण, सर्वोच्च न्यायालयानं विरोधकांची ही मागणी फेटाळून लावली आहे, यामध्ये हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. त्यामुळे विरोधी पक्षांना धक्का बसला आहे.
COMMENTS