भाजपकडून विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी या नावावर शिक्कामोर्तब?

भाजपकडून विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी या नावावर शिक्कामोर्तब?

मुंबई – राज्यात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झालं आहे. त्यामुळे भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं आहे. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता कोण होणार याकडे लक्ष लागलं होतं. परंतु विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी भाजपकडून सुजितसिंह ठाकूर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं असल्याची माहिती आहे. त्यामुळे या पदासाठी इच्छुक असलेल्या भाजपमधील अनेक नेत्यांची निराशा झाली असल्याचं दिसत आहे.

दरम्यान विधानसभेच्या विरोधीपक्षनेता पदासाठी सुरेश धस, महादेव जानकर आणि विनायक मेटे हे नेते इच्छुक होते. या तीनही नेत्यांनी जाहीरपणे या पदावर दावा केला होता.शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी या पदावर दावा केला होता. भाजपनं मला मंत्रिपद दिलं नव्हतं, म्हणून आता मला विरोधी पक्ष नेतेपद द्यावं, अशी मागणी विनायक मेटे यांनी केली होती. तसेच घटक पक्षाला विरोध पक्षनेतेपद द्यायचा निर्णय झाला तर मी खरा दावेदार आहे, अशी भूमिका रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी घेतली होती. भाजपने हे पद स्वतःकडे ठेवलं तर हरकत नाही, पण घटक पक्ष म्हणून माझाच विचार भाजपने करावा, असं जानकर म्हणाले होते. परंतु अशातच विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी भाजपकडून सुजितसिंह ठाकूर यांचं नाव समोर आल्यामुळे या नेत्यांची पदरी निराशा पडली असल्याचं दिसत आहे.

COMMENTS