महाराष्ट्र सरकारच्या हमीभावाच्या शिफारशींना केंद्र सरकारचा ठेंगा, विरोधकांनी सादर केली आकडेवारी !

महाराष्ट्र सरकारच्या हमीभावाच्या शिफारशींना केंद्र सरकारचा ठेंगा, विरोधकांनी सादर केली आकडेवारी !

नागपूर – केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमीभावाचे राज्य सरकारने स्वागत केलं आहे. परंतु राज्य सरकारने केलेल्या विविध पिकांसाठीच्या हमीभावाची शिफारसच केंद्र सरकारने स्वीकारली नसल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने जाहीर केलेला  हमीभाव आणि राज्य सरकारने शिफारस केलेला हमीभाव याचा तक्ता विरोधी पक्षानी  समोर आणला आहे. राज्याने केंद्राकडे 16 पिकांच्या हमीभावाची शिफारस केली होती. मात्र यापैकी एकही पिकाच्या हमीभावाची राज्याची शिफारस केंद्राने मान्य केली नाही. उलटपक्षी अनेक पिकांना राज्य सरकारने शिफारस केलेल्या पिकापेक्षा निम्मा हमीभाव जाहीर केला. पुढील तक्त्यावर नजर टाकल्यास हे स्पष्ट होते.

पीक  राज्य सरकार   केंद्र सरकार 

धान   –  3970          1750

ज्वारी  –  2827          2430

बाजरी  –  3485         1950

तूर     –  5722        5675

मूग     –  9234        6975

सोयाबीन –  4715        3399

कापूस   –  7272        5450

गहू      –  3308        1735

हरभरा   –  5558       4400

दरम्यान विरोधकांनी मांडलेल्या आकडेवारीनुसार यामध्ये राज्य सरकारनं केलेल्या शिफारस आणि केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या दरवाढीमध्ये मोठा फरक दिसून येत आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या हमीभावाच्या शिफारसींना केंद्र सरकारनं ठेंगा दाखवला असल्याचं दिसत आहे.

 

COMMENTS