विधीमंडळाचं अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता, युतीतल्या वादाचा फायदा घेण्याची विरोधकांची जय्यत तयारी !

विधीमंडळाचं अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता, युतीतल्या वादाचा फायदा घेण्याची विरोधकांची जय्यत तयारी !

मुंबई – राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला ४ जुलैपासून नागपुरात सुरुवात होणार आहे. हे अधिवेशन चांगलच गाजणार असल्याचं दिसून येत आहे. कारण गेली काही दिवसांपासून सुरु असलेल्या शिवसेना-भाजपच्या वादाचा फायदा विरोधक घेणार असल्याचं दिसत आहे. याबाबत विरोधकांनी जय्यत तयारी केली असून अधिवेशनामध्ये विविध मुद्द्यांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जाणार आहे. त्यामुळे नागपूरमध्ये होणारं हे पहिलच पावसाळी अधिवेशनच चागलंच गाजणार असल्याचं दिसत आहे.

या कोकणातील नाणार प्रकल्प, बुलेट ट्रेन, वाढती महागाई, शेतकरी कर्जमाफी, अशा अनेक मुद्द्यांवर शिवसेना-भाजपमध्ये मतभेद सुरु असल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेनं अनेकवेळा शेतक-यांच्या कर्जमाफीवरुन भाजपवर जाहीर टीका केली आहे. तर कोकणातील नाणार प्रकल्पालाही शिवसेनेचा जाहीर विरोध आहे. यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरु आहे. नेमकं याच वादाचा फायदा घेण्यासाठी विरोधक आता सज्ज झाले असल्याचं दिसत असून या मुद्द्यांवरुन सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधक करणार आहेत. त्यामुळे या वादळी अधिवेशनाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS