राज्यातील विविध प्रश्नांवरुन विरोधक आक्रमक, विधानभवनाच्या पाय-यांवर आंदोलन !

राज्यातील विविध प्रश्नांवरुन विरोधक आक्रमक, विधानभवनाच्या पाय-यांवर आंदोलन !

नागपूर – राज्यातील विविध प्रश्नांवरुन आज विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाच्या पाय-यांवर आंदोलन केलं आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत विरोधक आक्रमक झाले होते. बोंडअळी, मावा, तुडतुड्या रोगाची नुकसानभरपाई मिळावी, तसेच पिकविम्याची नुकसानभरपाई मिळाली पाहिजे यासह नाणार प्रकल्प रद्द व्हायला हवा या मागण्यांसाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केले. यावेळी विरोधी पक्षातील सर्वच आमदार सरकारविरोधात उतरले होते.

दरम्यान नाणारवरून कोकणाची फसवणूक केली असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तसेच पीकविमा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी अशा अनेक विषयांवर भाजप सरकार जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप करत विधिमंडळाच्या बाहेर सर्व विरोधी पक्षातील आमदार विधानभवनाच्या पाय-यांवर जमले होते. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत विविध पोस्टरही या आमदारांनी हातात घेतले होते. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवत शेतक-यांना बोंडअळी, मावा, तुडतुड्या रोगाची तत्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.

COMMENTS