संसदेत अश्रूधुराच्या नळकांड्या !

संसदेत अश्रूधुराच्या नळकांड्या !

कोसावो – विधीमंडळात आणि संसदेत आपण अनेकवेळा विरोधकांचा गोंधळ पाहिला असेल, परंतु संसदेतील मतदान रोखण्यासाठी कोसावो येथील संसदेत विरोधकांनी मोठा आणि आगळावेगळा गोंधळ घातला असल्याचं पहावयास मिळालं आहे. विरोधी पक्षातील खासदारांनी मतदान रोखण्यासाठी संसद भवनात चक्क अश्रुधुराचा वापर केला असल्याचं पहावयास मिळालं आहे. काल ही घटना घडली असून विरोधी पक्षातील खासदारांनी संसदेत चक्क अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या असून याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

काय आहे वाद ?

दरम्यान सीमा करारावर घेण्यात आलेलं मतदान रोखण्यासाठी विरोधकांनी हा अश्रुधुरांचा गोंधळ घातला असल्याची माहिती आहे. कोसावो आणि मोंटेनेगरो या दोन्ही देशांमध्ये सीमाप्रश्नावरून वाद  सुरु आहे. त्यामुळे कोसावोच्या संसदेत मोंटेनेगरोसोबत झालेल्या सीमा करारावर मतदान घेण्यात येणार होतं. परंतु मतदानाला सुरुवात होण्यापूर्वीच विरोधी पक्षातील एका खासदारानं संसदेत अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या. त्यानंतर मतदानाऐवजी संसदेतील सर्व खासदारांनी संसदेतून काढता पाय घेतला. मोंटेनेगरो सोबत झालेल्या सीमा करारामुळे कोसावोला 8200 हेक्टर जमिनीचं नुकसान होत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. त्यामुळेच मतदानाला त्यांनी विरोध केला होता.

COMMENTS