नागपूर – काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार आंदोलन केलं आहे. सर्व आमदारांनी रात्री दीड वाजेपर्यंत विधानसभेतच ठिय्या मांडला होता. बोंडअळी आणि मावा-तुडतुड्याच्या मदतीबाबत सरकारच्या उत्तरावरुन या सर्व आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली असल्याची माहिती आहे. त्यामुळे सर्व आमदार रात्री दीड पर्यंत विधानसभेत ठिय्या मांडून बसले होते.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन केल्यानंतर रात्री दीड वाजता या सर्व आमदारांनी आपलं आंदोलन मागे घेतले. मुख्यमंत्र्यांनी विखे-पाटील यांना यासंदर्भात निवेदन करण्याचं आश्वासन दिलं आहे. तसेच बोंडळी आणि धान उत्पादक शेतक-यांना नुकसानभरपाई देण्याच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी सरकारला अडचणीत आणलं असल्याचं दिसत आहे. शेतक-यांना हेक्टरी किती मदत दिली याची रक्कम जाहीर करा. तसेच जोपर्यंत माहिती देणार नाही तोपर्यंत सभागृहात बसून राहण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. परंतु मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनंतर शेवटी हे सर्व आमदार सभागृहातून बाहेर पडले.
COMMENTS