अधिवेशनापूर्वीच सत्ताधारी विरोधकांमध्ये घमासान

मुंबई – राज्यात कोरोनाचे संकट वाढले असून राज्याच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री व आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आता दहा दिवस होणार आहे. त्यानंतर अधिवेशन समाप्त होईल. यावरून आज अधिवेशनाच्या कार्यकाळाबाबत कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली.

दरम्यान या खडजंगीनंतर विरोधक कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतून बाहेर पडले. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सरकारला कुठलीही चर्चा करण्यास रस नाही. कोरोनाची भीती दाखवून अधिवेशन गुंडाळण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सरकारच्या पळपुटेपणाचा निषेध करत आम्ही बैठकीतून वॉकआऊट केला.”

COMMENTS