मुंबई – विधानसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी अधिकृत घोषणा केली. विरोधी पक्षनेत्याची घोषणा आज होणार की नाही, याबाबत संभ्रम होता. कारण, विधानसभेतील आजच्या कामकाचं स्वरुप पाहिल्यास अध्यक्षांनी तालिका नामनिर्देशित करणे, त्यानंतर अध्यक्षांची निवडणूक आणि राज्यपालांचं अभिभाषण असा क्रम देण्यात आला होता. त्यांच्या निवडीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जयंत पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.
दरम्यान फडणवीस यांच्या निवडीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भावना व्यक्त केली. या दिवसाची मला अपेक्षा नव्हती, मी इथं येईन अस कधीही म्हटलं नव्हत पण आलो, आज मी स्वत:ला भाग्यवान समजतो की, 25 ते 30 वर्षे जे आमच्या विरोधात होते ते मित्र झालेत तर जे मित्र होते ते आज विरोधात बसलेत. फडणवीसांशी असलेली मैत्री आपण कधीही लपवलेली नाही त्यांच्याकडून मी ५ वर्षांत बरचं काही शिकलो. कुठलीही गोष्ट मी काळोखात केली नाही. पदावर बसून न्याय देऊ शकलो नाही तर मी अपराधी, असेन असेही यावेळी ठाकरे म्हणाले आहेत.
COMMENTS