उस्मानाबाद – दत्ताभाऊ, गोपिनाथ मुंडे बोलतोय. तुम्हाला पंकजासोबत काम करायचय. हे वाक्य ऐकताच मला आश्चर्याचा धक्का बसला. पहाटे अडीचच्या सुमारास आलेला मुंडे साहेबांचा फोन कायमस्वरुपी स्मरणात असल्याची भावना उस्मानाबाद भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी व्यक्त केली. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचा मी जिल्हाध्यक्ष होतो. पक्षाच्या विविध कार्यक्रमात काम करण्याची संधी मला मिळाली होती. एके दिवशी संध्याकाळी कॉटवर झोपलो होतो. इतक्यात पहाटे अडीचच्या सुमारास फोन आला.
दत्ताभाऊ, गोपिनाथ मुंडे बोलतोय. क्षणभर काहीच समजले नाही. कोण, बोलतोय.कशासाठी फोन आहे. याची काहीच माहिती नाही. खरोखरच मुंडे साहेब बोलत होते. का, याचा वारंवार विचार करीत होतो. त्यांच्या बोलण्याला केवळ, हो साहेब म्हणून उत्तर दिले. त्यानंतर रात्रभर मी विचार करीत होतो. साहेबांचाच फोन होता का, याची खात्री येत नव्हती. तो क्षण आजही माझ्या स्मरणात राहतोय.
मुंडेसाहेबांच्या त्या फोनने माझे जीवन पालटले. मला राजकीय स्थान निर्माण करून देण्याची संधी दिली. पण, त्याचवेळी माझे नाव त्यांना सुचविले होते,आमदार सुजितसिंह ठाकूर साहेबांनी. त्यामुळे त्यांचाही मी तेवढाच रुणी आहे. ठाकूर साहेबांच्या पाठींब्यामुळे अन मुंडेसाहेबांच्या आशिर्वादाने मला राजकीय स्थान मिळाले. त्यामुळे मुंडे साहेबांचा, तो पहिला फोन कॉल आजही मला चांगला आठवतो. आणि कायमस्वरुपी स्मरणात राहिल. मुंडे साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन.
COMMENTS