मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोपल यांनाच याठिकाणी उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून बार्शीचे आ़मदार दिलीप सोपल यांच्या नावाला पक्षाध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांनी पसंती दर्शवली असून, सोपल यांनी उमेदवारी घ्यावी, असा त्यांचा आग्रह आहे़. त्यामुळे सोपल यांनीही निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती आहे. यापूर्वी सोपल हे निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याची चर्चा होती मात्र शरद पवारांच्या आग्रहामुळे त्यांच्यात गळ्यात उमेदवारीची माळ पडणार असल्याची माहिती आहे.
COMMENTS