उस्मानाबाद – अर्जुन खोतकर यांचा ताफा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अडवला !

उस्मानाबाद – अर्जुन खोतकर यांचा ताफा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अडवला !

उस्मानाबाद – जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज जिल्ह्याचा दुष्काळ पाहणी दौरा केला आहे. यादरम्यान पालकमंत्री अर्जुन खोतकर यांचा ताफा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आज अडवला आहे. तात्काळ दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी या कार्यकर्त्यांनी ताफा अडवला असून पारगाव टोल नाक्यावर या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे. यादरम्यान या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली असल्याची माहिती आहे.

दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळाच्या झळा शेतक-यांना बसत आहेत. मराठवाड्यात तर पाऊस कमी झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. याच पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज जिल्ह्याचा दुष्काळ पाहणी दौरा केला आहे. यादरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेरून लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केली आहे.

COMMENTS