उस्मानाबाद -शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांनी बुधवारी वाढदिवसाच्या निमित्ताने आगामी निवडणुकीची चांगलीच मोर्चेबांधणी केली.परिसरातील अनेक गावात त्यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा करीत
कार्यकर्त्यांची फौज तयार असल्याचे संकेत प्रतिस्पर्ध्यांसाठी तसेच विरोधकांसाठी त्यांनी यामाध्यमातून दिले आहेत.अजित पिंगळे हे गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेचे निष्टावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.
जुन्या कार्यकर्त्यांमधील एक दमदार कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. गेल्या अनेक निवडणुकींमध्ये त्यांनी सेनेला परिसरात वैभव प्राप्त करून दिले आहे. पक्षाचा कार्यकर्ता ते नेता अशा आघाड्यावर त्यांनी आपला चांगला जम बसविला आहे. शिवाय परिसारातील अनेक गावांत त्यांनी सेनेच्या माध्यमातून स्वतःचे वेगळे अस्तत्व निर्माण केले आहे. त्यामुळे त्यांची राजकीय आखाड्यात चांगलीच चर्चा असते. आगामी विधानसभेसाठी ते इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठीच त्यांनी वाढदिवसाचे निमित्त साधून मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. आतापर्यंत सेनेकडून उस्मानाबाद विधानसभेत उस्मानाबाद तालुक्यातील उमेदवार देण्यात
आले आहेत. मात्र आगामी निवडणुकीत कळंब तालुक्याला प्राधान्य द्यावे, अशी मागणी कार्यकर्त्यांमधून केली जात आहे. त्यामध्ये माजी नगराध्यक्ष शिवाजी
कापसे यांच्यानंतर पिंगळे यांचेच नाव घेतले जात आहे.
दरम्यान निवडणुकीच्या आखाड्यात मात्र त्यांना यश आलेले नाही. त्यांना गेल्या पंचवार्षिकमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. तर
गेल्या विधानसभा निवडणुकीत सेनेचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे काम करण्यात कुचराई केल्याचा ठपका कार्यकर्त्यांकडूनच त्यांच्यावर ठेवला
जात आहे. या सर्वच कसोट्यावर आता पिंगळे किती यशस्वी ठरतात. यावरून आगामी निवडणुकीची गणिते ठरणार आहेत.
दरम्यान सध्यातरी पिंगळे यांनी वाढिदवसाच्या माध्यमातून मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. शिवाय ओमराजे यांनी पिंगळे यांना फेटा बांधण्याचा फोटोही चांगलाच व्हायरल होत आहे. आता पिंगळे ओमराजेंना कायम फेटा बांधण्याचे काम देणार की ओमराजेच पिंगळेंनाकायम टोपी (फेटा बांधणार) घालणार, असा प्रश्न सेनेच्या गोटात चर्चीला
जात आहे.
COMMENTS