उस्मानाबाद – पेट्रोल, डीझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात कार्यकर्ते आक्रमक झाले होते. मोदी सरकारचा निषेध करीत घोषणाबाजी करण्यात आली. शिवाजी चौकातून मोर्चाला सुरवात झाली. युवक काँग्रेसच्या वातिने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
या मोर्चादरम्यान महिलांनी गॅसच्या दरवाढीचा निषेध केला आहे. यावेळी या महिलांनी रस्त्यावर चुल मांडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. तसेच पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दर तात्काळ कमी करावेत अशी मागणीही या महिला कार्यकर्त्यांनी केली आहे.
या मोर्चाला जिल्ह्यातील अनेक नागरिकांसह जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते शरण पाटील, जिल्हा परिषदेचे माझी अध्यक्ष ऍड. धीरज पाटील, रोहित पडवळ, अग्निवेश शिंदे, ऍड. दर्शन कोलगे, शशिकांत निरफळ आदी कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागही झाले होते.
COMMENTS