उस्मानाबाद – प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेसतर्फे संविधान बचाव रॅलीचं आयोजन करण्यात येणार आहे. त्याच्या तयारीसाठी काल उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचं मुख्यालय असलेल्या गांधी भवन कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक झाली. बैठकीत पुढं काँग्रेस नेते भाषण ठोकत होते. तर मागे कार्यकर्ते मोबाईलवर गेम खेळण्यात दंग होते. बिचारे कार्यकर्ते तरी काय करणार, गांधी भवनातील मेळाव्यासाठी साधे लाऊड स्पिकरही लावण्यात आले नव्हते. त्यामुळे पुढे नेते काय बोलतात तेच कार्यकर्त्यांना ऐकायला येत नव्हते. त्यामुळे पुढे नेत्यांची भाषणे सुरु होती. तर कार्यकर्ते मोबाईलवर दंग होते. अशा बैठकांमधून मग संविधान रॅलीचे नियोजन कसे झाले असेल त्याचा विचार न केलेलाच बरा. राहुल गांधींचे, प्रदेश काँग्रेसचे विचार आणि निरोप कार्यकर्त्यांना कसे जाणार हाही प्रश्न आहेच.
गेली अनेक दिवसांपासून जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये लाईटच नाही. कालच्या कार्यक्रमात लाईट नसल्यामुळेच लाऊड स्पिकरही लावता आला नाही. गांभी भवनाबाहेर जिल्ह्यातील गब्बर नेत्यांच्या अलिशान गाड्या होत्या. बिचा-या गांधी भवनमध्ये मात्र साधी लाईटही नाही. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष सत्तेत असलेल्या, श्रीमंत नेत्यांच्या, दोन माजी मंत्री असेलल्या या जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय आर्थिक विवंचनेत सापडलं की काय असे चित्र आहे.
COMMENTS