उस्मानाबाद – रावसाहेब दानवे मास्तरांच्या परिक्षेत जिल्ह्यातले भाजप पदाधिकारी नापास, प्रत्येकाची केली कानऊघडणी !

उस्मानाबाद – रावसाहेब दानवे मास्तरांच्या परिक्षेत जिल्ह्यातले भाजप पदाधिकारी नापास, प्रत्येकाची केली कानऊघडणी !

उस्मानाबाद – अशाने पक्ष चालत असतो का. तुम्ही आमदार दिसताय, पण तुमचे काम काही दिसत नाही. हा मतदारसंघ सेनेला सोडायचा का, अशा एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती करत  भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब यांनी जिल्ह्यातील भाजप पदाधिका-यांना छापले. रविवारी दानवे शहरात आल्यानंतर मोजक्याच पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन जिल्ह्याचा आढावा घेतला. दानवेंच्या या आढावा बैठकीत जिल्ह्यातील पदाधिकारी नापास झाले. तर लांबून आलेल्या पदाधिकाऱ्यांना बैठकीतून बाहेर काढल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त करीत काढता पाय घेतला.

एक बुथ २४ युथ या संकल्पनेतून भाजपची मोर्चेबांधणी सुरू आहे. उस्मानानाबाद लोकसेभेचा आढावा घेण्यासाठी दानवे रविवारी शहरात दाखल झाले. यावेळी त्यांनी तालुकानिहाय आढावा घेतला. बहुतांश तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या कामावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. तालुकाप्रमुखांना तालुक्यात किती बुथ आहेत, याची विचारणा झाल्यानंतर सांगता आले नाही. तर प्रत्येक बुथवर २४ युथ याप्रमाणे किती नवीन मतदारांची नोंदणी झाली. तेव्हा अनेकांना याचे उत्तर समाधानकारक देता आली नाहीत. त्यामुळे दानवेंचा पारा चांगलाच चढला.

ही जागा सेनेला सोडायची काय, असा प्रश्न करीत त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त केली. बुथ किती आहेत. आघाड्या झाल्या का, प्रशिक्षण झाले का, आदी प्रश्नांवर त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेतला. मात्र पदाधिका-यांकडून त्यांना समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत.

दरम्यान कार्यकर्त्यांच्या सोबत बैठक घेऊन नंतर आढावा घेण्याच्या ऐवजी केवळ आढावा बैठक झाली. यामध्ये बैठकीत बसलेल्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते यांना बैठकीतून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. आम्ही औसा, बार्शी, उमरगा लोहारा, परंडा भूम आदी तालुक्यातून आल्याचे सांगतिले. तरीही बैठकीला बसू दिले जात नसेल तर आम्हाला कशासाठी बोलावले, असा प्रश्नही कार्यकर्ते बोलून दाखवत होते.

गेल्या चार वर्षात जिल्ह्यात पक्षाची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे. कार्यकर्ते साधी मतदार नोंदणी योग्य पद्धतीने पूर्ण करू शकले नव्हते. त्यामुळे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना सोबत न घेता मेळावा घेतल्याची चर्चा कार्यकर्त्यांत सुरू होती. मात्र पदाधिकाऱ्यांच्या जोरावर पक्ष चालत नसून कार्यकर्ते असल्याशिवाय पक्ष चालविता येत नसल्याचे सांगत अनेक पदाधिकाऱ्यांनी बैठकीतून माघार घेतली.

COMMENTS