उस्मानाबाद – ‘या’ ग्रामपंचायतीतील सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार !

उस्मानाबाद – ‘या’ ग्रामपंचायतीतील सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार !

उस्मानाबाद – उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा (ता. कळंब ) येथील ग्रामपंचायत सदस्यांवर अपत्रतेची टांगती तलवार आली आहे. निवडणुकीत इतर बँकेच्या खात्यातुन निवडणुक काळात खर्च केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी तक्रार दाखल केली होती. या तक्रारी विरोधात राष्ट्रवादीच्या सदस्यांनी औरंगाबाद खंडपीठाकडे प्रकरण दाखल केले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हे प्रकरण चालवू नये अशी याचीका दाखल केली होती. या प्रकरणात औरंगाबाद खंडपीठाने सदरील प्रकरण जिल्हाधीकारी कार्यालयातच निकाली काढण्याचा आदेश दिला आहे.  यामुळे या प्रकरणात राष्ट्रवादीचे विकास बारकुल यांच्यासह सात ग्रा.पं. सदस्यावर अपत्रतेची टांगती तलवार आली आहे .

येरमाळा येथील ग्रामपंचायत निवडणुकीत स्वतंत्र बँक खाते उघडून निवडणूक खर्च करणे गरजेचे होते. त्याचा तपशील सक्षम अधिकारी यांच्याकडे देणे अपेक्षीत होते. सदर ग्रामपंचायत सदस्यांनी राज्य निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या पद्धतीत व मुदतीत खर्च दाखल केला नाही’ म्हणून ग्रामपंचायत सदस्य पदावरून त्यांना अपात्र करावे, असा अर्ज येथील शिवसेनेचे गटनेते संजय बारकुल यांनी जिल्हाधीकारी उस्मानाबाद यांच्याकडे दाखल केला होता.

सदरील प्रकरणात राष्ट्रवादी पक्षाचे ग्रामपंचायत सदस्य विकी वाघमारे , छाया मोहीते , उषा मोरे , वनमाला कळसाईत यांनी जिल्हाधीकारी उस्मानाबाद हे भारतीय जनता पार्टीच्या ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र करत नाहीत व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सदस्यांना अपात्रतेची कारवाई करण्याचे कारण देत मा . उच्च न्यायालयात याचीका क्र .12285 / 2018 दाखल केली होती . याचीकेत काकर्त्यांनी जिल्हाधीकारी यांच्यावर केलेले भेदभावाचे आरोप परत घेत असल्याबाबतचे शपथपत्र दाखल केले. यामुळे उच्च न्यायालयाने राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केलेली याचीका निकाली काढत जिल्हाधिकाऱ्यांना दोन्ही बाजुंचे म्हणने ऐकुन तात्काळ न्याय निर्णय देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे हे प्रकरण जिल्हाधीकाऱ्यांनीच निकाली काढण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले.

COMMENTS