उस्मानाबाद – औरंगाबाद नामांतरावरून वाद सुरू असताना आज मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत उस्मानाबाद येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणे आणि ४३० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यास आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यासाठी आवश्यक तेवढी पदनिर्मिती करण्यास आणि पदे भरण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विटरवर टाकलेल्या पोस्टमध्ये धारशीव असा उल्लेख केल्याने पुन्हा नामांतराच्या विषय़ावर राजकारण तापणार आहे.
या ट्टिवटमध्ये म्हटले आहे की, धाराशिव-उस्मानाबाद येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणे आणि ४३० खाटांचे रुग्णालय निर्माण करणे. या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी एकूण रुपये ६७४.१४ कोटी (अनावर्ती खर्च सुमारे रुपये ४२९.६३ व आवर्ती खऱ्च सुमारे २४४.५१ कोटी) इतका निधी उपलब्ध करून देण्यात येईल. नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी राष्ट्रीय आर्युविज्ञान आयोगाच्या मानकांप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारितील जिल्हा सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालय आणि क्षय रुग्णालय स्थावर जंगम मालमत्तेसह तात्पुरत्या स्वरुपात वैद्यकीय शिक्षण व औषधे द्रव्ये विभागास निशुल्क वापरास उपलब्ध करण्यास मान्यता देण्यात आली आली. याशिवाय हे वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय सार्वजनिक खाजगी भागिदारी तत्वावर स्थापन करण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले.#मंत्रिमंडळनिर्णय@AmitV_Deshmukh pic.twitter.com/qMed4OP6fV
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 13, 2021
COMMENTS