उस्मानाबाद – मंत्र्याच्या मुलाला जाब का विचारला म्हणून जातीवाचक शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला आहे. तामलवाडी (ता. तुळजापूर) पोलिस ठाण्यात याबाबत एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथे आले होते. त्या दरम्यान तेथील नेहरू कांबळे याने देशमुख यांना जाब विचारला. आम्हाला पाणी आणि घरकुलाची सुविधा उपलब्ध करू द्या. अशी मागणी त्याने केली. तेव्हा गावातील मारकड यास राग अनावर झाला. त्याने कांबळे यांना दमदाटी करत शिवीगाळ केली. असा
जाब कशासाठी विचारीत आहेस, असे म्हणत कांबळे याला जातीवाचक शिवीगाळ केली. कांबळे यांच्या तक्रारीवरून तामलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपअधीक्षक घुगे या घटनेचा तपास करीत आहेत.
COMMENTS