उस्मानाबाद – नगरपालिकेच्या सभेत घमासान, राष्ट्रवादीचे गटनेते आणि मुख्याधिका-यांची आरे-कारेची भाषा !

उस्मानाबाद – नगरपालिकेच्या सभेत घमासान, राष्ट्रवादीचे गटनेते आणि मुख्याधिका-यांची आरे-कारेची भाषा !

उस्मानाबाद – नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवदीचे गटनेते युवराज नळे व मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे एकमेकांना भिडले.नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी जोरदार घमासान झाले. आरे-कारे म्हणत गटनेते नळे यांनी मुख्याधिकाऱ्यांची खरडपट्टी केली. तर हा..हा.. म्हणत मुख्याधिकाऱ्यांनीही तोडीस तोड उत्तर दिले. पालिकेच्या वाचनालयाच्या मुद्यावरून हा प्रकार झाला. वाचनालयाची रद्दी गेल्या 10 वर्षांपासून काढलेली नाही.

तेथील कर्मचारी मुख्याधिकाऱ्यांची परवानगी नसल्याचे सांगत आहे. असे मत नळे यांनी सभेत मांडले. यावर मुख्याधिकाऱ्यांनी असे कोण म्हणाले. असा प्रश्न केला. त्यावर  नळे यांनी तुम्ही कोण मला विचारणारे म्हणत आरेतुरेवर आले. त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनीही आरे-कारे वापरत वातावरण गरम केले. दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले. दरम्यान सत्ताधारी तसेच विरोधकांनी सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पालिकेच्या सभागृहात चांगलेच घमासान पाहायला मिळाले. दोघांनाही शांत करण्यात इतर सदस्यांना यश आल्याने पुढील अनर्थ टळला.

COMMENTS